S M L

1 फेब्रुवारीपासून बेस्टचा प्रवास महागणार

Samruddha Bhambure | Updated On: Nov 21, 2014 01:23 PM IST

1 फेब्रुवारीपासून बेस्टचा प्रवास महागणार

21 नोव्हेंबर : येत्या 1 फेब्रुवारीपासून बेस्ट बसच्या किमान भाड्यात 1 रुपयांची दरवाढ होणार आहे. बेस्ट समितीने या भाडेवाढीला मंजुरी दिली आहे. तसेच परिवहन विभागाचा तोटा भरून काढण्यासाठी 1 एप्रिलपासून किमान बसभाड्यात आणखी 1 रुपयांची वाढ सुचविण्यात आली आहे.

या दरवाढीचा सर्वात मोठा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसणार असून त्यांचा मासिक पास 125 रुपयांवरून 300 रुपयांवर जाणार आहे. सर्वसामान्य प्रवाशांचे बसपास वाढणारच आहेत, त्याशिवाय ज्येष्ठ नागरिक आणि अंधांसाठीचे प्रवासभाडेही महागणार आहे. फेब्रुवारीपर्यंत मुंबई महापालिकेने बेस्टच्या तिजोरीत 112 कोटी रुपये जमा केल्यास 1 फेब्रुवारीपासून होणारी भाडेवाढ टळू शकेल.

दरम्यान, स्थायी समितीने जो 150 कोटी देण्याचा निर्णय घेतलाय त्या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करू आणि मुंबईकरांवर भाडेवाढ होणार नाही याची काळजी घेऊ, असं आश्वासन शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिलं आहे.

बेस्टची नवी भाडेवाढ

         पूर्वीचे दर              नवीन दर

  • 6 रुपये                   7 रुपये
  • 10 रुपये              13 रुपये
  • 12 रुपये              16 रुपये
  • 15 रुपये              20 रुपये
  • 18 रुपये              25 रुपये
  • 20 रुपये             30 रुपये

मासिक पासच्या दरांतली वाढ                   

                                              पूर्वीचे दर         नवीन दर

  • विद्यार्थी पास                            125 रुपये            300 रुपये
  • मॅजिक बिगर एसी पास       1000 रुपये          1200 रुपये
  • मॅजिक एसी पास                  3000 रुपये         3500 रुपये

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 21, 2014 12:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close