S M L

हुतात्मादिनी हुतात्मा स्मारकाजवळ शुकशुकाट !

Samruddha Bhambure | Updated On: Nov 21, 2014 02:05 PM IST

हुतात्मादिनी हुतात्मा स्मारकाजवळ शुकशुकाट !

21 नोव्हेंबर : संयुक्त महाराष्ट्रातल्या चळवळीतल्या पहिल्या 21 हुतात्म्यांचा आज स्मृतिदिन आहे, पण मुंबईतील हुतात्मा स्मारकाजवळ आज (शुक्रवारी) शुकशुकाट पसरला आहे.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मुंबई महाराष्ट्रातच राहावी यासाठी 106 कार्यकर्त्यांनी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या स्मरणार्थ 2000 सालापासून 21 नोव्हेंबर हा दिवस हुतात्मा दिवस म्हणून ओळखला जातो. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी हुतात्मा चौकात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडवीसांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. मात्र, मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त या कार्यक्रमाला इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पाठ फिरवल्याचं दिसत आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या बाता मारणारे कधी फिरकणार? असा संतप्त सवाल हुतात्म्यांच्या नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या असंवेदनशीलतेवर सर्वसामान्यांमधून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.


Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 21, 2014 12:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close