S M L

मुख्यमंत्र्यांचा जिल्हा सोसतोय दुष्काळाच्या झळा

Sachin Salve | Updated On: Nov 21, 2014 05:50 PM IST

मुख्यमंत्र्यांचा जिल्हा सोसतोय दुष्काळाच्या झळा

nagpur_drough21 नोव्हेंबर : दुष्काळाच्या झळा मराठवाड्याबरोबरच विदर्भालाही बसताय. नागपूर विभागातील 2 हजार 29 गावांनाही दुष्काळ सदृश स्थितीचा फटका बसलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यातल्या 525 गावांची आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सरकारी मदतीची अपेक्षा आहे.

गेल्या दोन वर्षांपासून निसर्गाच्या दुष्टचक्रात राज्यातील शेतकरी सापडला असून केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीची त्याला आशा आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण 1953 गावं आहेत. त्यापेकी 1844 गावांमध्ये खरीपाची लागवड झालीये. यापैकी 1995 गावांची आणेवारी जाहीर करण्यात आली असून 525 गावांची आणेवारी ही 50 टक्क्यांपेक्षा कमी आहंे. विशेष म्हणजे मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात दुष्काळाची स्थिती असल्याचं मान्य केलं. दुष्काळावर नियोजन करण्यासाठी समितीही स्थापन करण्यात आलीये.

नागपूर विभाग

- 4 जिल्ह्यांची आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी

- नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यांत दुष्काळसदृश स्थिती

- नागपूर जिल्ह्यात 525 गावं

- वर्धा जिल्ह्यात 1049 गावं

- चंद्रपूर जिल्ह्यात 448 गावं

- भंडारा जिल्ह्यात 7 गावं

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 21, 2014 05:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close