S M L

भय इथले संपत नाही..,'त्या' छकुलीची मृत्यूशी झुंज

Sachin Salve | Updated On: Nov 21, 2014 11:37 PM IST

भय इथले संपत नाही..,'त्या' छकुलीची मृत्यूशी झुंज

21 नोव्हेंबर : 'भय इथले संपत नाही...'अशीच दाहकताच एका छकुलीच्या वाट्याला आलीये. 28 दिवसांपूर्वी या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला होता. तीला सायन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय, पण पोलीस आणि हॉस्पिटल प्रशासनाने तिच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केलंय. योग्य उपचारांअभावी तिच्या अंगावर पूर्ण रॅश आलीय. एवढंच नाहीतर झुरळं, ढेकणांनी तीच्या अथरुंणाशी ठाण मांडलंय. आरोपी तर अजूनही मोकाट आहे पण तिच्या सुरक्षेसाठी रक्षकही नेमण्यात आलेला नाही. आयबीएन लोकमतने या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी या छकुलीच्या उपचाराचा आणि उपचारानंतर शिक्षणाचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार असल्याचं सांगितलं.

मुंबईतील वडाळा भागात 24 ऑक्टोबर रोजी या 9 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली होती. वडाळ्याच्या शांतीनगरमध्ये पीड़ित मुलीच्या वडिलाचे स्वीट मार्टचे दूकान आहे. ही मुलगी दुकानासमोर फटके उडवत होती. त्यावेळी अनोळखा इसम आला आणि तिला घेऊन गेला. पीडित मुलीच्या वडिलांनी ही बाब लक्षात आल्यावर मुलीचा शोध घेतला पण मुलगी दिसली नाही. त्यानंतर पालकांनी वडाळा टी.टी.पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. रात्री दीड वाजेच्या सुमारास मुलगी त्या पालकांना दिसली तिची चौकशी केली असता तीने घडलेला प्रकार सांगितला. तीला सायन हॉस्पिटलमध्ये उपचारसाठी दाखल करण्यात आलं.पण तब्बल 28 दिवस उलटले तरी आरोपी अजून सापडले नाही. याहुन धक्कादायक म्हणजे गेल्या 28 दिवसांत या छकुलीकडे मात्र हॉस्पिटल प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केलंय. योग्य उपचारांअभावी तिच्या अंगावर पूर्ण रॅश आलीय. तिच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, 'छकुली'ला जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आलंय. डॉक्टर तिच्याकडे नीट लक्ष्यही देत नाही आणि कुणी विचारत नाही. दिवसेंदिवस तीची प्रकृती खालावत चाललीये. तिच्या बेडजवळ झुरळं, ढेकणांनी ठाण मांडलंय. आम्ही ही बाब हॉस्पिटलच्या कर्मचार्‍यांच्या लक्षात आणून दिली पण त्यांनी याची दखल घेण्याची तसदीसुद्धा घेतली नाही. अखेरीस काही सामाजिक संस्थांची आम्हाला मदत घ्यावी लागली अशी व्यथा तिच्या पालकांनी मांडली. आयबीएन लोकमतने या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पीडित मुलीच्या उपचाराचा पूर्ण खर्च सरकार उचलणार आणि उपचारानंतर मुलीच्या शिक्षणाचा खर्चही उचलणार अशा शब्द आयबीएन लोकमतला दिलाय. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणाची माहिती कळवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. हॉस्पिटल्या प्रशासनाकडून हलगर्जी झाली असेल तर चौकशी करण्यात येईल असंही मुंडेंनी स्पष्ट केलं. तसंच राज्यमंत्री विद्या ठाकूर या पीडित मुलीची भेट घेणार आहे. या प्रकरणातील आरोपीचे रेखाचित्रही जारी करण्यात आले आहे पण आरोपी अजूनही मोकाटच आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 21, 2014 11:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close