S M L

भरमसाठ टोलमुळे वरळी-वान्द्रे सी लिंक वादाच्या भोव-यात

25 जून वरळी-वान्द्रे सी लिंकचं येत्या 30 जूनला उद्घाटन होत असताना टोल आकारणीवरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे.आतापर्यंत या सी लिंकच्या बांधकामावर 1635 कोटी रूपये खर्च झाले. या सी लिंकचे सध्या जरी 4 लेन्स् जरी सुरू होत असले तरी सुरुवातीपासूनच मुंबईकरांकडून टोल वसूल केला जाणार आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते सी लिंकचं उद्घाटन होणार असल्याच्या अंदाजाच्या उत्सुकतेवर पाणी फिरणारच्या चर्चांना उधाण आलं आहे. पश्चिम उपनगरातील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी वरळी-वान्द्रे सी लिंक बांधण्यात आला आहे. हा भारतातला सर्वात महत्त्वाचा प्रकल्प आहे. सी लिंकचा रस्ता हा 6.6 किलोमीटर लांब असून तो आठ पदरी मोठा आहे. त्यामुळे जिथे रस्त्यावरून वरळी-वान्द्रे अंतर कापायला पाऊण तास लागतो तिथे सी लिंकच्या मुळे तेच अंतर कापण्यासाठी 15 ते 20 मिनिटं लागणार, असं इंजिनिअरचं म्हणणं आहे. परिणामी सर्वसामान्य मुंबईकराला सी-लिंकचं प्रचंड आकर्षण असल्यामुळे तो त्याच्या उद्घाटनाची आतुरतेने वाट बघत आहे. पण टोलच्या दरपत्रकानुसार कार अथवा जीपसाठी 50 रुपये मिनी बस आणि मिनी ट्रकसाठी 75 रुपये तर प्रवासी बस आणि ट्रकसाठी 100 रुपये इतका टोल आकारला जाणार आहे. अशाप्रकारच्या भरमसाठ टोल आकारणीमुळे सामान्य मुंबईकर या सी लिंकडे पाठ फिरवतील अशी भीती व्यक्त केली जाते आहे.वरळी-वान्द्रे सी लिंक पूर्ण होत असतानाच तो कंत्राटदारांच्या वादाच्या भोव-यात सापडल होता. त्यामुळे पुलाचं बांधकाम लांबणीवर पडतंय की काय याची चिंता लागून राहिली होती. पण मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्तक्षेपामुळे पुलाचं रखडलेलं बांधकाम पूर्ण झालं. आणि अखेर अनेक अडथळ्यांना पार करत अखेर वांद्रे-वरळी सागरी पूल सुरू झाला. पण आता टोल आकारणीवरून या पुलाच्या संदर्भात पुन्हा एक नवा वाद होण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 25, 2009 12:09 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 25, 2009 12:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close