S M L

केंद्रातच राहणार, राज्याच्या सत्तेबाबत बोलणी सुरू -गीते

Sachin Salve | Updated On: Nov 22, 2014 04:47 PM IST

केंद्रातच राहणार, राज्याच्या सत्तेबाबत बोलणी सुरू -गीते

anant_geete22 नोव्हेंबर : विधिमंडळ अधिवेशनापूर्वी भाजप-शिवसेनेमध्ये समझोत्याची शक्यता असल्याचे संकेत सेनेचे नेते आणि केंद्रीय मंत्री अनंत गीतेंनी दिले आहे. राज्यातील भाजप सरकारमध्ये सहभागी होण्यासंदर्भात शिवसेना सकारात्मक असून त्यादृष्टीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बोलणी सुरू आहेत अशी माहिती अनंत गीतेंनी दिली. ते अलिबागमध्ये बोलत होते.

हिवाळी अधिवेशन पुढील महिन्यात होत आहे त्यापार्श्वभूमीवर सेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा चर्चेला सुरूवात झालीये. उद्धव ठाकरे यांनी तूर्तास विरोधीबाकावर बसणार असल्याची भूमिका घेतली असली तरी सेनेच्या नेत्यांचा त्यांच्यावर दबाव वाढत चालला आहे. तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी सेनेला सोबत घेण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केलीये. शिवसेनेचे एकमेव केंद्रात असलेले अवजड उद्योग मंत्री अनंत गीतेंनी याबाबत संकेत दिले आहे. केंद्रातून शिवसेना बाहेर पडणार नाही. जेव्हा मी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीला जातो तेव्हा भाजपचे खासदार गीते आले याचा अर्थ शिवसेनासोबत आहे असा शेरा देतात. त्यामुळे आमचे संबंध अजूनही चांगले आहे. राज्याच्या सत्तेत सहभागी व्हायचं की, नाही याबद्दल उद्धव ठाकरे चर्चा करत असून तेच योग्य तो निर्णय घेतील असं गीतेंनी सांगितलं. विशेष म्हणजे, जोपर्यंत अनंत गीते केंद्रात आहे. तोपर्यंत भाजप आणि सेनेच्या मैत्रीचा पूल कायम राहिलं असं वक्तव्य महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केलं होतं. त्यातच शुक्रवारी सुनील प्रभू यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. आता गीतेंनी समझोत्याचे संकेत दिल्यामुळे सेना-भाजपची दिलजमाई होईल का हे पाहावं लागणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 22, 2014 04:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close