S M L

भय इथले संपत नाही, मुंबईत आणखी एका 'छकुली'वर बलात्कार

Sachin Salve | Updated On: Nov 22, 2014 09:31 PM IST

भय इथले संपत नाही, मुंबईत आणखी एका 'छकुली'वर बलात्कार

rape_case_mumbai22 नोव्हेंबर : एका 'छकुली'वर अत्याचाराची घटना ताजी असताना मुंबईनगरीत आणखी एका छकुलीवर अत्याचाराची धक्कादायक घटना घडलीये. घरासमोर खेळत असलेल्या चार वर्षांच्या चिमुरडीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आलाय. या चिमुरडीला रेल्वे पोलिसांच्या मदतीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. या चिमुरडीची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे तिला मुंबईच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

नालासोपारा हे गुन्हेगारांची बजबजपुरी बनली आहे. चोरी, लूट, या बरोबर आता महिला आणि लहान मुले ही सुरक्षित नाहीत. नालासोपार्‍याच्या पूर्वेला आपल्या घरासमोर खेळत असलेल्या एक चार वर्षाच्या चिमुरडीचंे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एक चार वर्षाची मुलगी आपल्या घरासमोर संध्याकाळी खेळत असताना तिच्यावर एक नराधामाच्या पाशवी नजारा पडल्या आणि त्याने तिच्या घरासमोरून तिचं अपहरण केलं. अपहरण करुन हा नराधम तिला विरार रेल्वे स्थानकाजवळील फलाट क्रमांक 8 येथील एक झाडीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि तिथून फरार झाला. ही चिमुरडी विरार रेल्वे स्थानकात रडत असताना जागरूक नागरिकांनी तिला पाहिले आणि रेल्वे पोलिसांना सदर घटनेची खबर दिली. रेल्वे पोलिसांनी तिला विरार प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले तेव्हा ही सर्व घटना समोर आली.या चिमुरडीची प्रकृती गंभीर असल्याने तिला मुंबई येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नालासोपारा पोलिसांनी या बाबत अज्ञात व्यक्तीच्या विरोधात बलात्कार आणि अपहरणाचा गुन्हा नोंदवला असून पुढील तपास करत आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 22, 2014 09:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close