S M L

विक्रांतवर संक्रांत, इतिहासाचा साक्षीदार दुर्देवाने भंगारात !

Sachin Salve | Updated On: Nov 23, 2014 02:04 AM IST

विक्रांतवर संक्रांत, इतिहासाचा साक्षीदार दुर्देवाने भंगारात !

ins_vikrant22 नोव्हेंबर : भारताची पहिली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत...जसे नावं तशी होती तिची कामगिरी...देशाच्या संरक्षणात धाडसी कामगिरी बजावणार्‍या विक्रांतवर आता संक्रांत आलीये. रणागणात दुश्मनाला पाणी पाजणार्‍या युद्धनौकेची लढाई कोर्टात अपयशी ठरली आणि आता काही दिवसांतच इतिहासाचा हा ठेवा भंगारात नेस्तेनाबूत केला जाणार आहे.

1950चं दशक..पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते. पाकिस्तानशी संबंध ताणलेलेच होते. भारताला आपल्या सैन्याबरोबरच गरज होती ती नौदलाला आणखी मजबूत करण्याची..या परिस्थितीत नौदलात मोठ्या दिमाखात सामिल झाली ती आएनएस विक्रांत..भारताची पहिली विमानवाहू युद्धनौका..

आएनएस विक्रांतचा इतिहास

- 1957 - भारताने ही अपूर्ण एचएमएस हर्क्युलस ब्रिटनकडून विकत घेतली

- 1961 - काम पूर्ण झाल्यावर आयएनएस विक्रांत या नावानं ही युद्धनौका सेवेत रूजू

- 1971 - भारत-पाकिस्तान युद्धात अत्यंत महत्त्वाची कामगिरी

- 1997 - विक्रांत सेवेतून निवृत्त

- 2002 - विक्रांतवर युद्धस्मारक आणि संग्रहालय बनवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी

गेली अनेक वर्षं मुंबईच्या समुद्रकिनार्‍यावर संग्रालय म्हणून उभी असलेल्या या युद्धनौकेनं मुंबईकरांना इतिहासाची आठवण करून दिली.

पण भारताच्या सीमांचं 4 दशकं रक्षण करणार्‍या विक्रांतची डागडुजी करणं परवडणार नाही, असा पवित्रा तत्कालीन आघाडी सरकारनं घेतला. विक्रांतला वाचवण्याचे बरेच प्रयत्न झाले. काही सामाजिक कार्यकर्ते कोर्टात गेले. राजकारण्यांनी विक्रांतवर आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी, ऑगस्ट 2014 मध्ये सुप्रीम कोर्टाने विक्रांतला तोडण्यास हायकोर्टाने दिलेली मंजुरी कायम ठेवली आणि या आठवड्यात विक्रांतला तोडण्याचं काम सुरू झालंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 22, 2014 10:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close