S M L

15 वर्षांच्या तरुणीची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या, तीन संशयीत ताब्यात

Samruddha Bhambure | Updated On: Nov 23, 2014 03:54 PM IST

15 वर्षांच्या तरुणीची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या, तीन संशयीत ताब्यात

23 नोव्हेंबर :  मुलुंडमध्ये एका 15 वर्षांच्या तरुणीने इमारतीच्या बाराव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. इमारतीवरुन उडी मारण्यापूर्वी तरुणीने डाव्या हातावर 'आय हेट यू' आणि अर्धवट मोबाईल नंबर लिहिला होता. दहावीत शिकणार्‍या या तरुणीने मुलुंडमधील महावीर टॉवरच्या बाराव्या मजल्यावरुन उडी मारली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलीचे दोन मित्र आणि एक मैत्रिणीला अटक केली आहे.

एकतर्फी प्रेमप्रकरणाच्या त्रासाला कंटाळून या मुलीने जीव दिल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. एक मुलगा या मुलीला सतत त्रास द्यायचा. या मुलीने त्याला नकार दिल्यावरही आरोपी तिच्यावर दबाव टाकत होते. या जाचाला कंटाळून अखेर या मुलीने आयुष्यच संपवलं. तिच्या हातावर 'आय हेट यू' असं लिहिलं होतं. पोलिसांनीही अतिशय वेगात तपास करत तिघांना अटक केली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 23, 2014 12:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close