S M L

जमीनहस्तांरण प्रकरणी दीपक मानकरवर बारावा गुन्हा दाखल

26 जून काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेला पुण्याचा माजी नगरसेवक लॅन्डमाफिया दीपक मानकर याच्यावर बाणेरमध्ये 5 गुंठे जमीन हडप केल्याप्रकरणी बारावा गुन्हा दाखल झाला आहे. चतुशृंगी पोलीस स्टेशनमध्ये विजयकुमार सिंग यांनी बाणेर जमिनीची जागा हडप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्याने मुंबई हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठीही अर्ज केला होता. त्यावर गुरुवारी सुनावणी होणार होती. मात्र दीपक मानकर अजूनही फरार आहे. फरारी नगरसेवकाला पोलिसांना पकडण्यास अपयश आलं नाही. पण तोच नगरसेवक कोर्टात जामिनासाठी अर्ज कसा काय करू शकतो, या मुद्द्यावरून पुण्याच्या नागरिकांमधून आश्चर्य आणि संताप व्यक्त होत आहे. पुणे पोलिसांनी मध्यंतरी मानकरचा पत्ता सांगणा•याला आधीच 10 हजाराचं बक्षीसही जाहीर केलं आहे. त्याचबरोबरीने याच पुणे पोलिसांनी मानकरला शोधण्यासाठी नऊ पथकं तैनात केली आहेत. पुण्याच्या नातू कुटुंबाच्या बंगल्याच्या जागा हस्तगत केल्याप्रकरणी दीपक मानकरची लॅन्डमाफिया ही ओळख निर्माण झाली. नातू कुटुंबाच्या प्रमुखाला पुण्याच्या काँग्रेसभवनमध्ये दीपक मानकरने दादागिरी केल्यामुळे त्याला पक्षातून निलंबित केलं. त्याचा भाऊ शिवसेनेचा पुण्याचा नेता शिवाजी मानकर याच्यावरही जमीन हस्तांतरण प्रकरणी पुणे पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. शिवाजी मानकरची गुन्हेगारी पाश्‍र्वभूमी पाहता त्याचीही शिवसेनेने हकालपट्टी केली. आता दीपक मानकरचं जमीन हस्तांरणाचं आणखी एक नवं प्रकरण पाहात पुण्यात लॅन्डमाफियांची कृष्णकृत्यांना ऊत आल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 26, 2009 09:07 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 26, 2009 09:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close