S M L

मिरज शहरात गॅस्ट्रोचं थैमान, 3 दिवसांत चौघांचा मृत्यू

Samruddha Bhambure | Updated On: Nov 23, 2014 08:21 PM IST

मिरज शहरात गॅस्ट्रोचं थैमान, 3 दिवसांत चौघांचा मृत्यू

23 नोव्हेंबर : सांगली जिल्ह्यातल्या मिरज शहरात गॅस्ट्रोने थैमान घातलं आहे. गेल्या 3 दिवसांमध्ये गॅस्ट्रोमुळे चौघांचा मृत्यू झाला आहे. सुहासिनी जोग, रमेश पाटील, अस्लम नदाफ आणि अब्दुल लतीफ अशी मरण पावलेल्यांची नावं आहेत. आतापर्यंत 500 हून जास्त जणांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे.

जुलाब आणि उलट्यांनी हैराण झालेल्या रुग्णांना मिरजमधल्या सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अनेक खासगी दवाखान्यांमध्ये कॉट शिल्लक नाहीत, त्यामुळे वर्‍हांड्यात जमिनीवर सतरंजी टाकून रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, मिरज शहरात पिण्याच्या पाण्यात सांडपाणी मिसळलं जात असल्यानं महापालिका दूषित पाण्याचा पुरवठा करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. सांडपाणी रस्त्यावर पसरल्यामुळे गॅस्ट्रोचा फैलाव होतोय, पण महापालिकेचे अधिकारी आणि स्थानिक नगरसेवक याकडे दुर्लक्ष करत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 23, 2014 08:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close