S M L

नेपोलियन बोनापार्टच्या हॅटचा 19 कोटी रुपयांना लिलाव

Samruddha Bhambure | Updated On: Nov 23, 2014 07:23 PM IST

नेपोलियन बोनापार्टच्या हॅटचा 19 कोटी रुपयांना लिलाव

23 नोव्हेंबर : फ्रान्सचा जगप्रसिद्ध सम्राट नेपोलियन बोनापार्टच्या एका 'हॅट'चा लिलाव करण्यात आला आहे. ही हॅट एका चाहत्यानं चक्क 19 लाख युरो म्हणजे 19 कोटी रुपयांना खरेदी केली आहे.

दक्षिण कोरियात राहणार्‍या या चाहत्याचं नाव आहे टी.के. ली असं. मोनॅको देशाच्या शाही परिवारानं या 'हॅट'चा लिलाव केला. या 'हॅट' सोबतच नेपोलियनच्या आणखी काही वस्तूंचाही लिलाव करण्यात येणार आहे. 1800 मध्ये झालेल्या मॉरिंगोच्या युद्धात नेपोलियनने हीच हॅट घातली होती. सम्राट नेपोलियन बोनापार्टने आपल्या कारकीर्दीत एकू ण 120 हॅट्सचा वापर केला होता. नेपोलियनच्या एकून 120 हॅट्सपैकी फक्त 19 हॅट्स सध्या उपलब्ध आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 23, 2014 07:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close