S M L

फास्ट फूडच्या जमान्यात 'स्लो फूड'ची लज्जत

Samruddha Bhambure | Updated On: Nov 23, 2014 07:31 PM IST

फास्ट फूडच्या जमान्यात 'स्लो फूड'ची लज्जत

23 नोव्हेंबर : सध्याच्या फास्ट फूडच्या जमान्यात इटलीमधला स्लो फूड फेस्टिव्हल चांगलाच गाजतोय. इटलीमधल्या तुरीनमध्ये नुकताच पाचवा इंटरनॅशनल स्लो फूड फेस्टिव्हल पार पडला. या स्लो फूड फेस्टिव्हलची सुरुवात मोठ्या दणक्यात झाली. सुमारे 3 हजार शेतकरी आणि वेगवेगळ्या संघटना यात सहभागी झाल्या होत्या.

स्लो फेस्टिव्हलची सुरुवात झाली ती रोममध्ये... तिथल्या मॅकडोनल्डच्या आऊटलेटला विरोध करण्यासाठी ही चळवळ उभी राहिली, पण यातूनच जन्म झाला या दर्जेदार खाद्य मेळाव्याचा. सध्या हा फेस्टिव्हल जैवविविधता आणि खाद्यसंस्कृतीचा वारसा सांभाळण्यासाठी आणि त्याचं संवर्धन करण्यासाठी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 'आर्क ऑफ टेस्ट' या विशेष भागात एक हजारांहून जास्त खाद्यप्रकार उपलब्ध होते. मात्र मोठ्या प्रमाणावर केली जाणारी यांत्रिक शेती आणि क्लायमेट चेंजमुळे अन्नपदार्थांवर जे परिणाम होतात तेही यात मांडण्यात आले आहेत. 65 वर्षांचे कार्लो पेट्रनीन हे या स्लो फूड चळवळीचे जनक मानले जातात. पेट्रनिन पुढच्या वर्षी हा महोत्सव भारतातही भरवणार आहेत.

पुढच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मेघालयात हा स्लो फूड फेस्टिव्हल होणार आहे. ईशान्येकडच्या शेती आणि जैवविविधतेबाबत काम करणार्‍या संस्था या नेसफास या महोत्सवात भाग घेणार आहेत आणि याबद्दल त्यांनी आतापासूनच तयारी करायला सुरुवात केलीय. भारतात होणारा हा फेस्टिव्हल एक भव्य खाद्यसोहळाच असेल. या महोत्सवात जगभरातले नामवंत शेफ आपल्या पाककृती सादर करणार आहेत. जिथे मौजमजेसोबत खाणेही असेल. या महोत्सवात भारताला उत्तम, स्वच्छ आणि चांगल्या दर्जाच्या जगभरातल्या खाण्याची चव चाखायला मिळेल.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 23, 2014 07:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close