S M L

माजी पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांचे निधन

Samruddha Bhambure | Updated On: Nov 24, 2014 02:05 PM IST

माजी पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांचे निधन

24 नोव्हेंबर :  काँग्रेस ज्येष्ठ नेते आणि माजी पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांचे आज पहाटे साडेतीनच्या सुमारास निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. गेले काही दिवसांपासून मुरली देवरा आजारी होते. देवरा यांचे पार्थिव दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत मुंबई काँग्रेस कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी चार वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून मुरली देवरा यांची ओळख होती. गांधी घराण्याशीही त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. 1968 साली मुरली देवरा यांनी नगरसेवक म्हणूण आपल्या कारकि र्दीची सुरुवात केली. अर्थशास्त्रात पदवी मिळविणारे देवरा हे 1977मध्ये मुंबईचे महापौर झाले. त्यानंतर 2004 साली ते राज्यसभेवर खासदार म्हणून गेले आणि 2006 साली ते पेट्रोलियम मंत्री झाले. ते दक्षिण मुंबईतून लोकसभेवर निवडून आले. सध्या ते राज्यसभेचे खासदार होते.

पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

मुरली देवरा यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. पंतप्रधान म्हणाले, की ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांतता देवो. मुरली देवरांचे सर्वच पक्षांची चांगले संबंध होते. कालच मी त्यांच्या कुटुंबीयांशी देवरा यांच्या प्रकृतीविषयी चोकशी केली होती. आज त्यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दु:ख होत आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 24, 2014 08:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close