S M L

नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन सलग दुसर्‍यांदा वर्ल्ड चॅम्पियन

Samruddha Bhambure | Updated On: Nov 24, 2014 10:24 AM IST

नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन सलग दुसर्‍यांदा वर्ल्ड चॅम्पियन

24 नोव्हेंबर : नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन सलग दुसऱ्यांदा 64 घरांचा राजा ठारला आहे.   त्याने काल (रविवारी) पाच वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या विश्वनाथन आनंदचा पराभव करत वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपवर आपलं नाव कोरलं आहे.

रशियाच्या सोची येथे आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेत एकूण 12 फेऱ्यांमध्ये विश्वनाथन आनंद आणि मॅग्नस कार्लसन यांच्यात सामना रंगणार होता.पण नॉर्वेच्या कार्लसनने अकराव्या फेरीतच जेतेपद पटकावले. त्याने दहाव्या फेरीपर्यंत 6.5 गुणांची कमाई केली. कार्लसनने अकराव्या डावात पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळायला सुरूवात केली. आनंदने त्याला कडवी टक्कर द्याचा प्रयत्न केला होता.

आनंदला आपलं आव्हान कायम राखण्यासाठी या लढतीच्या अकराव्या डावात विजय आवश्यक होता. मात्र, कार्लसनने बाजी मारली. जवळपास साडेचार तासांच्या लढतीनंतर आनंदने पराभव मान्य केला आणि कार्लसनने सलग दुसर्‍यांदा विश्वविजेतेपद मिळवलं. यापूर्वी चेन्नई येथे झालेल्या स्पर्धेत कार्लसनने आनंदला धूळ चारली होती.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 24, 2014 09:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close