S M L

पॉपस्टार मायकल जॅक्सनचं निधन

26 जून संगीताला नृत्याची जोड देऊन ब्रेक डान्स हा नृत्यप्रकार लोकप्रिय करणारा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा पॉपस्टार मायकल जॅकसन याचं हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी पहाटे 4 वाजता निधन झालं. तो 50 वर्षांचा होता. गेल्या काहीवर्षांपासून श्‍वसनाच्या आजरपणामुळे चाहत्यांपासून दूर राहिलेल्या मायकलला अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळी त्याला लॉस एंजिलिसमधील हॉलम्बी हिल इथून रोनाल्ड रिगन युसीएलए मेडिकल सेंटरमध्ये हलवण्यात आलं. तेव्हाही त्याला श्‍वास घ्यायला प्रचंड त्रास होता. परिणामी युसीएलए मेडिकल सेंटरमध्ये तो कोमामध्ये गेला. त्यावेळी युसीएलएमध्ये उपचार सुरू असतानाच मायकेलचं निधन झाल्याचं वृत्त जाहीर केलं. या घटनेमुळे संगीत जगताबरोबरच जॅक्सनप्रेमींनाही मोठा धक्का बसला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत 29 ऑगस्ट 1958साली अमेरिकेतील इंडियाना प्रातांतल्या गॅरी शहरात मायकल जोसेफ जॅक्सनचा जन्म झाला. तो वंशाने आफ्रो-अमेरिकन होता. नऊ भावंडात सातवा मुलगा असलेल्या मायकलने घराच्या बेताच्या परिस्थितीमुळे मोटाऊन इथ गायक म्हणून करिअरला सुरुवात केली. 1979 मध्ये त्याने सोलो गायक म्हणून गायनास सुरुवात केली. त्यानंतर प्रचंड लोकप्रिय झालेल्या जॅक्सनच्या अनेक म्युझिक अल्बमसनी विक्रीचे रेकॉर्ड तोडले. आतापर्यंत त्याच्या 750 मिलियन अल्बमची विक्री त्याच्या 'थ्रीलर' या अल्बमच्या 59 मिलिआन कॅसेट खपल्या आहेत. त्याने ' जॅक्सन - 5' ते ' किंग ऑफ पॉप ' या रॉक बॅन्डचा प्रवास स्वबळावर केला आहे. संगीत क्षेत्रातल्या सर्वात मानाचा समजल्या जाणा-या ग्रॅमी पुरस्कारने जॅक्सनला 18 वेळा सान्मानीत करण्यात आलं आहे. 1989 प्रसिध्द हॉलिवूड अभिनेत्री एलिझाबेथ टेलरने मायकलचं गाण्यातलं वकूब पाहता त्याला ' किंग ऑफ पॉप ' ही पदवी एका रॉक कॉन्सर्टमध्ये बहाल केली होती. मायकल केवळ त्याच्या गण्यामुळेच नाही तर तो त्याच्या स्टाइलमुळे अनेकदा चर्चेत राहिला होता. त्याने अनेकदा त्याच्या चेहर्‍याची प्लॅस्टीक सर्जरी केली होती. स्टायलो म्हणून लोकप्रिय असणा-यामायकलच्या व्यक्तिगत आयुष्यात अनेक वादळ निर्माण झाली. लहान मुलाच्या लैंगिक शौषणाचे अनेक आरोप त्याच्याविरुद्ध झाले.मात्र ते आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. जॅक्सनने भारतासही एकदा भेट दिली होती. राज ठाकरे शिवसेनेत असताना त्यांनी शिवउद्योग सेने मार्फत त्याला नव्वदच्या दशकात भारतात आणलं होतं. असा हा पॉप स्टार मायकल जॅक्सन 13 जुलैला इतिहासात सर्वात मोठा कमबॅक करण्याच्या तयारीत असणार्‍या मायकलच्या निधनाने जगभरातील पॉपप्रेमींवर शोककळा पसरली आहे. मायकलच्या मृत्यूची बातमी समजात त्याच्या चाहत्यांनी रोनाल्ड रिगन युसीएलए मेडिकल सेंटर बाहेर एकच गर्दी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 26, 2009 09:28 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 26, 2009 09:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close