S M L

मोबाईल बिल भरतांना मग विजेचा का नाही ?,खडसेंनी शेतकर्‍यांनाच सुनावलं

Sachin Salve | Updated On: Nov 24, 2014 11:07 PM IST

khadse34624 नोव्हेंबर : विरोधी पक्षात असताना शेतकर्‍यांचा कळवळा दाखवणार्‍या भाजप नेत्यांची सत्तेत येताच भाषा बदललीय. टंचाईग्रस्त परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अकोल्याच्या दौर्‍यावर आलेल्या महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी शेतकर्‍यांनाच खडेबोल सुनावले.

मोबाईलवर बोलणं थांबू नये म्हणून तुम्ही मोबाईलचं बिल भरता ना महिन्याचं महिन्याला पण ज्याच्यामुळे उजेड मिळतो त्याचं विजेचं बिल भरत नाही मला काही हे पटत नाही अशा शब्दात खडसेंनी शेतकर्‍यांनाच सुनावलं.

तसंच काही प्रमाणात पैसे भरा, काही प्रमाणात आम्ही सवलत देऊ 'असंही खडसे म्हणाले. निवडणुकीच्या आधी विरोधी पक्षात असलेल्या भाजपची भाषा सत्ताधारी झाल्यावर बदलली आहे अशी चर्चा आता शेतकर्‍यांमध्ये रंगली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 24, 2014 06:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close