S M L

ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना सितारादेवी कालवश

Samruddha Bhambure | Updated On: Nov 25, 2014 07:38 PM IST

ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना सितारादेवी कालवश

25 नोव्हेंबर :  ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना सितारादेवी यांचे आज (मंगळवारी) सकाळी वयाच्या 94व्या वर्षी वृद्धापकाळाने मुंबईत निधन झाले.

गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांच्यावर मुंबईतील जसलोक रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर आज सकाळी त्या काळाच्या पडद्याआड गेल्या. 'कथ्थक क्वीन' म्हणून सितारादेवींची ओळख होती.

सितारादेवी यांचे बॉलिवूडशीही नाते होते. 'मदर इंडिया' या चित्रपटात त्यांनी नृत्य केलं होतं. तसेच 'नगिना', 'रोटी' आणि 'वतन' या चित्रपटासाठी नृत्य दिग्दर्शनही केलं होतं. सितारादेवी यांना त्यांच्या कारकीर्दीत अनेक पुरस्कार मिळाले. 1969 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 1973 मध्ये पद्मश्री पुरस्कार आणि 1995 मध्ये कालिदास सन्मानानं सितारादेवी यांना गौरविण्यात आलं होतं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 25, 2014 08:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close