S M L

शेतकर्‍यांबाबतच्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला -खडसे

Samruddha Bhambure | Updated On: Nov 25, 2014 04:22 PM IST

Eknath khadse11

25 नोव्हेंबर : मी शेतकर्‍यांच्या वीज बिलासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असे खडसेंनी स्पष्ट केले असून माझे वाक्य अर्धवटच दाखवण्यात आले. शेतकर्‍यांची क्रूर चेष्टा करणारे एकनाथ खडसे आणि अजित पवार एकच, असा टोला उद्धव यांनी खडसेंना लगावला होता. त्या पार्श्वभूमीवर बोलताना खडसेंनी उद्धव यांना प्रत्युत्तर दिले आहे.

राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती आणि यावर ठोस पावलं उचलण्यासाठी सरकारवर दडपण वाढतच चालले आहे. याचाच एक भाग म्हणून दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या वीजबिलाला स्थगिती देण्यात आली आहे. मोबाईलचं बिल भरता मग वीज बिल का नाही भरत, या वक्तव्यावरून चहूबाजूंनी जोरदार टीका झाल्यानंतर आता महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी आपली भूमिका बदलत शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे.

एकनाथ खडसेंनी नेमक्या कोणत्या घोषणा केल्या ?

- दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांची वीज तोडणे आणि वीज बील वसुलीला स्थगिती

- टंचाईग्रस्त शेतकर्‍यांना वीजबिलात 33 टक्के सूट

- दुष्काळग्रस्तांना पाण्याचे टँकर पुरवण्याचे सरकारचे आदेश

- दहावीच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क माफ

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 25, 2014 01:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close