S M L

प्रक्रिया ऑनलाईन ऍडमिशनची

काय आहे ऑनलाईन ऍडमिशन प्रक्रियेची खासियत ?20 ते 150 कॉलेजचे फॉर्म एका अर्जात भरता येतील. परिणामी वेळ आणि पैशाची बचत होईल. 125 रुपयात ऍडमिशन अर्जांचं सबमिशन करता येणार आहे. फक्त एका अर्जात सर्व ऍडमिशन होणार आहे. प्रत्येक कॉलेजमध्ये फॉर्म विकत घ्यायला जाण्याची घाई होणार नाही.ऑनलाईन ऍडमिशन करताना जर अडचणी आल्या तर :- विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशात जर काही अडचण येत असेल तर त्यांनी एमकेसीएलच्या जवळच्या केंद्रात जाऊन आपल्या अडचणी दूर कराव्यात.एमकेसीएलचं जवळचं केंद्र शोधण्यासाठी विद्यार्थ्यांनी 9763680404 या नंबरवर एसएमएस पाठवून माहिती मागवावी. विद्यार्थी जर मार्चमध्ये परीक्षेला बसला असेल तर त्यानं प्रथम M टाईप करावा. त्याच्या पुढे स्पेस देऊन बैठक क्रमांक टाईप करावा. आणि तो एसएमएस 9763680404 या नंबरवर पाठवावा. त्याला एमकेसीएलच्या जवळच्या केंद्राचं नाव, पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक एसएमएसवर कळवण्यात येईल. तसंच विद्यार्थ्यांना 022-67609211 आणि 022-67609222 या नंबरवर फोन करून MKCL ची कॉल सेंटर सुविधा वापरता येईल. ही सुविधा सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत उपलब्ध आहे.ऑनलाईन प्रवेश अर्ज भरल्यावर PRINT-OUT OK हे बटण क्लिक केल्यावर समोर एक ऑप्शन येतो. त्यात Please lock the application यावर क्लिक केल्यास अर्जात कोणतेही बदल करता येणार नाहीत. अर्जातील चुकीच्या दुरुस्तीसाठी तसंच त्रुटींच्या पूर्ततेसाठी योग्य ते कागदपत्र सबमिशन सेंटरवर सादर करणं आवश्यक आहे. अन्यथा त्यांचा अर्ज निवडप्रक्रियेत समाविष्ट होणार नाहीत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 27, 2009 09:28 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 27, 2009 09:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close