S M L

भारत-नेपाळ नव्या मैत्रीपर्वाला सुरूवात

Sachin Salve | Updated On: Nov 25, 2014 11:27 PM IST

भारत-नेपाळ नव्या मैत्रीपर्वाला सुरूवात

25 नोव्हेंबर : भारताच्या शेजारी असलेल्या नेपाळ आणि भारतात नव्या मैत्रीपर्वाला सुरुवात झालीये. आज (मंगळवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळमध्ये दाखल झाले. मोदींनी नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईरालांची भेट घेतली. यावेळी काठमांडू - वाराणसी, जनकपूर-अयोध्या आणि लुंबिनी-बोध गया या दोन शहरांदरम्यानच्या विकासकरारांवर दोन्ही नेत्यांनी सह्या केल्या.

यासोबतच पंतप्रधान मोदींनी काठमांडू -नवी दिल्ली बससेवेचं उद्घाटन केलं. सोबतच नेपाळसाठीच्या 'फोन कॉल्स'च्या दरात 35 टक्क्यांची कपात करण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केलीय. भारतातून नेपाळमध्ये आता 500 आणि 1000 रूपयांच्या नोटा नेता येणार आहेत.

त्यासाठी 25 हजार रूपयांपर्यंतची मर्यादा असेल. याशिवाय भारताकडून नेपाळला `ध्रुव` हेलिकॉप्टर भेट देण्यात येणार आहे. नेपाळ लष्करासाठी हे हेलकॉप्टर उपयोगी असेल. सोबतच नेपाळमध्ये भारत पोलीस ट्रेनिंग सेंटरही उभारणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 25, 2014 11:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close