S M L

INS सिंधुरत्न अपघाताप्रकरणी 7 नौदल अधिकारी दोषी

Sachin Salve | Updated On: Nov 26, 2014 01:29 PM IST

sindhuratna26 नोव्हेंबर : आएनएस सिंधुरत्न या पाणबुडीला झालेल्या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या 7 नौदल अधिकार्‍यांना दोषी ठरवीण्यात आलंय. याच अपघातानंतर तत्कालीन नौदलप्रमुख डी.के जोशी यांनी राजीनामा दिला होता.आएनएस सिंधुरत्न पाणबुडीला या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात आग लागली होती. त्यात दोन अधिकार्‍यांचा मृत्यू झाला होता.

या अपघाताचं नेमक कारण शोधून काढण्यासाठी नेव्हीनं बोर्ड ऑफ इनक्वायरी नेमली होती. त्याच्या अहवालाची माहिती संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मंगळवारी राज्यसभेत दिली. सिंधुरत्नपूर्वी आएनएस सिंधूरक्षक या पाणबुडीला 14 ऑगस्ट 2013 रोजी भीषण अपघातात झाला होता. त्यात नेव्हीच्या 18 जवानांना आपला जीव गमवावा लागला होता. या प्रकरणाची बोर्ड ऑफ इनक्वायरी अजून सुरू असल्याची माहितीही पर्रिकर यांनी दिली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 26, 2014 01:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close