S M L

दप्तरांच्या ओझ्यातून विद्यार्थ्यांची होणार सुटका ?

Sachin Salve | Updated On: Nov 26, 2014 02:05 PM IST

दप्तरांच्या ओझ्यातून विद्यार्थ्यांची होणार सुटका ?

daptar26 नोव्हेंबर : खांद्यावरच्या दप्तराच्या जड ओझ्यातून शाळकरी मुलांची लवकरच सुटका होण्याची शक्यता आहे. हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार सरकारने याप्रकरणी 8 जणांची समिती स्थापन केलीय. ही समिती दोन महिन्यांच्या आत आपला अहवाल सादर करणार आहे. प्राथमिक शिक्षणाचे संचालक या समितीचे अध्यक्ष असणार आहे.

शाळेत मुलांना जड दप्तराचा त्रास, दप्तरातलं ओझं किती असावं, यासंबंधीची माहिती अहवालात देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. काही शहरांमध्ये शाळांनी मुलांची जड दप्तराच्या ओझ्यातून सुटका केलीय. पण अनेक शाळांमध्ये मुलांना अजूनही हे ओझं पेलावं लागतंय. त्याविरोधात हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर कोर्टाने समिती नेमण्याचे आदेश दिले आहे.

मुंबई हायकोर्टाच्या उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आधी दाखल केलेल्या याचिकेला धरून शाळेत लहान मुलांना जड दप्तर शाळेत घेऊन जाण्याविषयीच्या निर्णयाविषयी 8 जणांची एक समिती स्थापन करून दोन महिन्यांच्या आत रिपोर्ट सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायलयाने दिला आहे. या आठ सदस्यीय समितीत प्राथमिक शिक्षणाचे संचालक यांच्या अध्यक्षतेखाली 7 जण यावर आपला अहवाल सादर करणार आहेत. यात एका शाळेचा प्रतिनिधी, प्राचार्य, पालक ,मानसशास्त्र तज्ञ, शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण राज्य परिषदेचे उपसंचालक असे या समितीत सदस्य असणार आहेत. शाळेत मुलांना जड दप्तर घेऊन जाताना होणारा त्रास, दप्तरातील ओझं किती असावं यासंबंधीची माहिती काढून अहवालात नमूद करण्याविषयी निर्देश उच्च न्यायलयाने दिले आहेत. काही मेट्रो शहरांमध्ये शाळांनी मुलांची जड दप्तरांतून सुटका केली आहे. पण अनेक शाळांमधून लहान मुलांना आजही जड दप्तरं घेऊन जावी लागत आहेत. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी उच्च न्यायलयाने दिलेला हा निर्णय महत्वपूर्ण आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 26, 2014 02:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close