S M L

वेस्टइंडीज दौरा : वनडेत भारताची शानदार सलामी

27 जून भारताने कॅरेबियन टुरमधील पहिल्याच वन डेत शानदार विजय मिळवला आहे. विंडीजचा 20 रन्सने पराभव करीत भारताने आता 4 वन डे सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताचा मिस्टर सिक्सर युवराज सिंग या विजयाचा हिरो ठरला आहे. भारताची सुरुवात जरा अडखळती झाली. गंभीर आणि रोहित शर्मा झटपट आऊट झाल्यानंतर युवराजने इनिंग सांभाळली. युवराज सिंग आणि दिनेश कार्तिकने तिस-या विकेटसाठी केलेल्या 135 रन्सच्या विक्रमी पार्टनरशिप केली. युवराजने विंडीज बॉलिंगवर हल्लाबोल करीत शानदार सेंच्युरी ठोकली. त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने विंडीजपुढे विजयासाठी 50 ओव्हर्समध्ये 340 रन्सचं टार्गेट ठेवलं गेलं. त्या टार्गेट करता विंडीजचा कॅप्टन ख्रिस गेल, चंद्रपॉल आणि सरवानने चांगलीच झुंज दिली. पण ते टीमला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. भारतार्फे आशिष नेहरा आणि युसुफ पठाणने प्रत्येकी 3 विकेट मिळवत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. विंडीजची इनिंग 319 रन्समध्येच कोसळली. युवराज सिंग विंडीज दौ-यातल्या पहिल्या वनडेचा मॅन ऑफ द मॅच ठरला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 27, 2009 11:52 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 27, 2009 11:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close