S M L

ऑटोप्सी रिपोर्टनंतर मायकलच्या मृत्यूचं गूढ उकलणार

27 जून मायकलच्या मृत्यूचं गूढ ऑटोप्सीचा रिपोर्ट आल्यानंतर कळणार असल्याचं मायकेलचा भाऊ जर्मिन जॅक्सन यांने सांगितलं. मायकल जॅक्सनचा मृत्यू हृदयविकाराने झाला की औषधांचा ओव्हरडोस देऊन त्याला मारण्यात आलं, यावर चर्चा सुरू आहे. त्यात मायकल जॅक्सनच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करताना त्याचा खाजगी डॉक्टर अचानक गायब झाला आहे. त्यामुळे मायकलच्या मृत्यूचं गूढ वाढलं.' गेल्या अनेक वर्षांपासून आजारी असलेला मायकेल हा शरीराने आणि मनाने खंगत चालला होता. मात्र तो तेवढ्याच निकराने आपल्या आजाराशी झुंज देत होता. पण तो असा अचानक जाईल, असं कधीच वाटलं नव्हतं, असंही जर्मिन जॅक्सन म्हणाला. मायकलला त्रास सुरू झाल्यावर त्याला लॉस एंजीलिसमधल्या हॉलम्बी हिल इथून रोनाल्ड रिगन युसीएलए मेडिकल सेंटरमध्ये हलवण्यात आलं. ' डॉक्टरांनी मायकलला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. एक तासाहून जास्त वेळ ते त्यासाठी झटत होते. पण त्यात ते अयशस्वी ठरले, ' असं बोलताना त्याचे अश्रू अनावर झाले. त्यावेळी जर्मीन जॅक्सन ' आमच्या कुटुंबीयांनी मीडियालाही विनंती केली की कृपया या कठीण वेळेत आम्हाला एकांतात राहू द्या. मायकल आम्ही नेहमीच तुझ्यावर प्रेम करत राहू. वुई लव्ह यू मायकल, ' असंही म्हणाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 27, 2009 11:56 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 27, 2009 11:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close