S M L

नवर्‍याच्या जिवावर निवडून येणार्‍यांनी शिकवू नये, देशपांडेंचा तोल ढळला

Sachin Salve | Updated On: Nov 26, 2014 10:22 PM IST

नवर्‍याच्या जिवावर निवडून येणार्‍यांनी शिकवू नये, देशपांडेंचा तोल ढळला

sandeep deshpande26 नोव्हेंबर : मुंबई महापालिकेच्या महासभेत आज (बुधवारी) मनसेचे गटनेते संदीप देशपांडेंचा तोल ढळला. नवर्‍याच्या जिवावर निवडून येणार्‍यांनी शिकवू नये, अशी शेरेबाजी संदीप देशपांडेंनी केली. त्यांच्या वक्तव्याचा विरोधात महिला नगरसेविका एकत्र आल्या आणि विरोध केला.

पालिकेच्या महासभेत आज डेंग्यूवर चर्चा सुरू होती. त्यादरम्यान संदीप देशपांडे यांनी नवर्‍याच्या जिवावर निवडून येणार्‍यांनी शिकवू नये असं वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यामुळे संदीप देशपांडे आणि भाजपच्या ज्योति अळवणी यांच्यात बाचाबाची झाली.

त्यानंतर देशपांडे यांच्या वक्तव्याच्या विरोधात महिला नगरसेवकांनी एकत्र येत सभागृहाबाहेरच निषेध केला. यामध्ये कोणालाही दुखवण्याचा आपला उद्दयेश नव्हता, असं सांगत संदीप देशपांडेंनी आता झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितलीय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 26, 2014 10:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close