S M L

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औरंगाबाद दौर्‍यावर

Sachin Salve | Updated On: Nov 27, 2014 03:37 PM IST

devendra fadnvis4427 नोव्हेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज औरंगाबाद दौर्‍यावर आहेत. आज दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयात मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी एक महत्वपूर्ण बैठक घेणार आहेत.

या बैठकीत आत्तापर्यंत शेतकर्‍यांना मिळालेल्या मदतीचा आणि दुष्काळग्रस्त परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे.

संध्याकाळी साडेसहा वाजता मुख्यमंत्री औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. आज मुख्यमंत्री औरंगाबादलाच मुक्काम करणार असून उद्या ते नागपूरला जाणार आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 27, 2014 12:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close