S M L

नगरसेवकांचा अभ्यास दौरा की पिकनिक ?

Sachin Salve | Updated On: Nov 28, 2014 02:07 PM IST

नगरसेवकांचा अभ्यास दौरा की पिकनिक ?

kdmc_nagarsevak28 नोव्हेंबर : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक केरळच्या अभ्यास दौर्‍यावर गेले आहेत. केडीएमसच्या 107 पैकी 55 नगरसेवक या अभ्यास दौर्‍यावर आहेत. मात्र त्यांनी पाठवलेल्या फोटोंवरून तो अभ्यास दौरा आहे की, पिकनिक अशी कुजबूज नागरिकांमध्ये सुरू झाली. महापालिकेच्या खर्चानं होणार्‍या या अभ्यास दौर्‍यासाठी तब्बल 33 लाख रूपये खर्ची घालण्यात आले आहेत.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात अनेक समस्या आहेत. दोन्ही शहरं दिवसेंदिवस अधिक बकाल होत चालली आहेत. अर्धवट राहिलेले विकास प्रकल्प, बीओटी प्रकल्पांचा उडालेला बोजवारा आणि स्वच्छतेचे वाजलेले तीनतेरा अशी एकंदरीत परिस्थिती असताना गुजरात, हैदराबाद, बंगलोर या राज्यांचे दौरे करून आलेल्या नगरसेवकांनी शहरांतील विकासकामांसाठी या दौर्‍यांचा कसा वापर केला हे अजून स्पष्ट केलं नाही. अभ्यास दौ-यावर गेलेले नगरसेवक मौजमजा करत असल्याचे फोटो व्हाट्स ऍप आणि सोशल मीडियावरून अपलोड झाले आणि नागरिकांमध्ये एकच संतापाची लाट उसळली. नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त करायला सुरूवात केल्यानंतर उशीरा सुचलेलं शहाणपण आठवून नगरसेकांनी नंतर अभ्यास दौर्‍याचे फोटो अपलोड करून सारवासारवीचा प्रयत्न केला. पण आधीचे फोटो बघून संतापलेल्या नागरिकांनी नगरसेवकांवर टीकेची झोड उठवली होती. महापालिकेच्या खर्चानं होणार्‍या या अभ्यास दौर्‍यासाठी तब्बल 33 लाख रूपये खर्ची घालण्यात आले आहेत. यापूर्वीही अशा प्रकारचे अनेक अभ्यास दौरे नगरसेवकांनी केले मात्र त्यातून काय साधलं हा संशोधनाचाच विषय आहे. त्यामुळे हे दौरे मौजमजेसाठी आहेत अशी टीका होतेय. ही केवळ करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी असल्याची भावना कल्याण-डोंंबिवलीकर व्यक्त करत आहेत.

 कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी आतापर्यंत केलेल्या अभ्यास दौरे

17 नोव्हेंबर 2011 - गोवा- खर्च 10 लाख, 50 हजार 299

16 ऑगस्ट 2012 ट हैदराबाद- खर्च 8 लाख रूपये

12 मार्च 2012 - गुजरात, राजस्थान- खर्च 18 लाख 90 हजार रुपये

23 नोव्हेंबर 2013 बंगळुरू- 25 लाख 31 हजार 500 रुपये

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 28, 2014 12:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close