S M L

ISISमध्ये सहभागी होण्यासाठी गेलेला तरुण भारतात परतला

Sachin Salve | Updated On: Nov 28, 2014 11:01 PM IST

ISISमध्ये सहभागी होण्यासाठी गेलेला तरुण भारतात परतला

kalyan_boy_back28 नोव्हेंबर : जिहादच्या शोधात इराकमध्ये आयसीस या दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी गेलेल्या चार तरुणांपैकी एक तरूण तरुण भारतात परतलाय. आरिफ माजिद असं त्याचं नाव आहे. तो मुंबईजवळच्या कल्याणचा रहिवासी आहे. आयसीसमध्ये सहभागी होण्यासाठी तो इराकला गेला होता. सध्या आसिफ मजीद हा राष्ट्रीय तपास संस्था म्हणजे एनआयएच्या ताब्यात आहे.

'हम लोग जिहाद के लिये निकल चुके है, अब हमारी मुलाकत जन्नत में होगीं' असं सांगून कल्याणमधील चार तरुण इराकमध्ये पोहचले होते. मात्र सात महिन्यांनंतर या चार तरुणांच्या डोक्यावरच भूत उतरलं. दोनच दिवसांपूर्वी या चारही तरुणांचा ठावठिकाणा लागला होता. चारही तरुण सुखरूप असून भारतात परतण्यासाठी इच्छुक आहे. या चौघांनी आपल्या कुटुंबियांशी संपर्क साधला आणि भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या कुटुंबियांनी एनआयएशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली. अखेरीस आज त्यापैकी आरिफ माजिद हा तरूण भारतात परतला. आणखी तीन तरुण भारतात परतण्याच्या वाटेवर आहे. एनआयएने आसिफ मजीदला ताब्यात घेतले असून चौकशी करत आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 28, 2014 03:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close