S M L

अल्पवयीन मुलीवर बाप-बेट्याकडून बलात्कार

Sachin Salve | Updated On: Nov 28, 2014 05:55 PM IST

अल्पवयीन मुलीवर बाप-बेट्याकडून बलात्कार

28 नोव्हेंबर : एका 10 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारील राहणार्‍या मुलाने आणि त्याच्या वडिलाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडलीये. गेली वर्षभर ही नराधम बाप-बेट्याची जोडी पीडितेवर अत्याचार करत होते. अखेर त्यांच्या काळ्याकृत्याचा भांडा फूटला. भांडूप पोलिसांनी या दोन्ही नराधमांना अटक केली आहे.

पीडित मुलगी ही आपल्या आईसोबत भांडूपमध्ये राहते. तीची आई दिवसभर कामाला जात होती. यावेळी 60 वर्षीय आरोपी या मुलीला आपल्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार करत होता. हा नराधम बाप एवढ्यावरच थांबला नाही तर आपल्या 25 वर्षाच्या मुलाला सुद्धा या मुलीवर बलात्कार करावयास सांगत असे. आणि दोघांनी गेल्या एका वर्षांपासून हा प्रकार सुरू होता.गुरुवारी रात्री या मुलीला पोटात त्रास जाणवत असल्याने तिने आपल्या आईला सांगितले. यावर सगळा प्रकार समोर आला. तिच्या पालकांनी भांडूप पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही नराधमास अटक केली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 28, 2014 05:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close