S M L

व्हॉट्स अॅप हॅक करून तरुणीला घातला 50 हजारांना गंडा

Sachin Salve | Updated On: Nov 28, 2014 08:01 PM IST

व्हॉट्स अॅप हॅक करून तरुणीला घातला 50 हजारांना गंडा

28 नोव्हेंबर : ई मेल, नेट बँकिंग, क्रेडिट-डेबिट कार्डचे पासवर्ड हॅक करून आर्थिक फसवणुकीच्या प्रकारात आता व्हॉट्स अॅपचीही भर पडली आहे. एका तरुणीचे व्हॉट्स अॅप अकाऊंट हॅक करून तिच्या मैत्रिणीशी चॅट करत एका तरुणाने हातोहात 50 हजारांला गंडा घातल्याची घटना ठाण्यात घडली आहे.

"मी एका सीम कार्ड कंपनीतर्फे बोलतोय. तुमचे कार्ड उद्या बंद होणार आहे. जर ते बंद होऊ नये तर तुम्ही तुमचे काही कागदपत्र लगेच पाठवा जर त्याला वेळ नसेल तर तुम्ही तुमचा व्हॉट्स अॅप बंद करा. मग तुम्हाला एक पासवर्ड येईल तो मला मेसेज करा ", असा फोन कॉल जर तुम्हाला कुणी विचारला तर सावधान असे करू नका ! पहिले शहानिशा करा हा कॉल तुमचे व्हॉट्स अॅप हॅक करू शकते. असंच घडलंय ठाण्यातील दोन तरुणींबरोबर.

घडलेली हकीकत अशी की, असाच एक कॉल ठाण्यात एका मुलीला आला व तिने आपला पासवर्ड समोरच्या व्यक्तीला पाठवला आणि तिथेच सर्व चुकले व यामुलीचा व्हॉट्स अॅप हॅक झाले आणि त्यात या मुलीने काही वेळा करिता तिचा व्हॉट्स ऍप बंद केला होता ज्या संध्याकाळी या मुलीने व्हॉट्स ऍप बंद केला त्याच संध्याकाळी त्या भामट्या तरुणाने या मुलीचा नावाने तिच्या मैत्रिणीशी चॅट करण्यास सुरुवात केली. माझे काही आक्षेपार्ह फोटो एका तरुणाने काढल्याने मी पुरती फसले आहे... मला मदत करं...प्लीज मला फोन करू नकोस... माझे प्रॉब्लेम्स आणखी वाढतील. ते फोटो मिळवण्यासाठी मला काही पैशाची गरज आहे. तू मदत करशील का?, मी साहिल नावाच्या व्यक्तीला पाठवते त्याच्याकडे पैसे दे...असे मेसेज त्या मुलीच्या व्हॉट्स अॅपवरून तिची मैत्रीण कडे धडकत होते.

फोटो परत मिळवण्यासाठीच मी उद्या वज्रेश्वरीला जाणार असल्याचे या मुलीने चॅटवर सांगितलं होतं. आणि मैत्रीण नेहमी प्रमाणे दुसर्‍या दिवशी कामावर जाण्यासाठी बसमध्ये चढली त्याच बसमध्ये साहिल नावाचा तरुण आला. काहीही करून मदत कर, तिचा जीव वाचव...पैसे नसतील तर गळ्यातली सोन्याची चेन तरी दे असे आर्जव तो करू लागल्यानंतर या मैत्रीनीने भाबडेपणाने 50 हजार रुपये किंमतीची चेन काढून त्याला दिली. त्यानंतर या मैत्रिणीला काहीसा संशय आल्याने तिने आपल्या मैत्रिणीला फोन केला. 50 हजाराची चेन तुझ्या मित्राला दिलीय. तेव्हा ज्या मुलीचा व्हॉट्स अॅप हॅक झाला होता ती तर ऑफिसला आहे. मी कधी तुला असं सांगितलं नाही. मग या दोघींच्या लक्षात आले की, काहीतरी गडबड आहे,तोपर्यंत फार उशीर झाला होता तो भामटा बसस्टॅण्डवर पसार झाला होता. पोलिसांनी चौकशी केली असता या मुलीचे व्हॉट्स ऍप अकाऊंट हॅक करून भामट्यांनी ही लूट केल्याचे सिद्ध झालंय.

असे झाले हॅकिंग

तुमच्या मोबाइल फोन क्रमांकाची मुदत संपली असून, तो 24 तासांत बंद होईल. ते टाळायचे असेल तर उद्या गॅलरीत येऊन आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करा, असा फोन या मुलीला आला होता. गॅलरीत येणे शक्य नसल्याचे तिने सांगितल्यानंतर तुम्ही तुम्हचे ,व्हॉट्स अॅपबंद करा मग तुम्हाला एक पासवर्ड येईल तो पासवर्ड तुम्ही मला मसेज करा आणि काही काळ व्हॉट्स ऍप बंद तेव्हा तुमचे काम होऊन जाईल, असं त्या व्यक्तीनं सांगितलं. या मुलीने तो क्रमांक मेसेज केला आणि तिथेच व्हॉट्स अॅप हॅक झाल्याची माहिती ठाणे नगर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी गायकवाड मडम यांनी दिली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 28, 2014 06:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close