S M L

शरद पवारांनी बोलावली शिलेदारांची बैठक

Sachin Salve | Updated On: Nov 29, 2014 01:07 PM IST

sharad_pawar_on_bjp29 नोव्हेंबर : विधानसभेत झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक राष्ट्रवादी कार्यालयात सुरू झालीय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ,प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे , छगन भुजबळ,अजित पवार,जयंत पाटील नेते उपस्थित आहेत.

आज पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्हाध्यक्ष,आमदार आणि खासदार ,लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार यांच्याशी शरद पवार चर्चा करणार आहेत.

तर उद्या कोकण,मराठवाडा ,खानदेश आणि मुंबई या मधील पराभूत उमेदवारांशी चर्चा करणार आहेत. विशेष म्हणजे भाजप आणि शिवसेना एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आलाय. या पार्श्वभूमीवर शरद पवार काय भूमिका मांडता हे पाहण्याचं ठरणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 29, 2014 01:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close