S M L

नांदेडमध्ये विष पिऊन शेतकर्‍याची आत्महत्या

Sachin Salve | Updated On: Nov 29, 2014 01:38 PM IST

नांदेडमध्ये विष पिऊन शेतकर्‍याची आत्महत्या

nanded_suside29 नोव्हेंबर : राज्यभरात शेतकर्‍यांच्या आत्महत्येचं सत्र सुरूच आहे. नांदेडमध्ये नापिकी आणि कर्जाला कंटाळून एका अल्पभुधारक शेतकर्‍याने विष पिऊन आत्महत्या केली. हिमायतनगर तालुक्यातील पारडी या गावात ही घटना घडली.

45 वर्षीय दत्ता मंचीकट्टे यांनी आपल्या तीन एकर शेतीत सोयाबीन आणि कापूस घेतलं होतं. पण पीक न उगवल्याने त्यानी कर्ज काढून दुबार पेरणी केली. पण पावसाअभावी कापूस करपला आणि सोयाबीनही आलं नाही.

दत्ता मंचीकट्टे यांच्यावर स्टेट बँकेचे अडीच लाखाचं कर्ज होतं. शिवाय दुबार पेरणीसाठी त्यानी पुन्हा उसने पैसे घेतले होते. मागच्याच वर्षी त्यानी मुलीच लग्न केलं. त्याच कर्ज अजून फिटलेलं नाही. आता पाऊस नाही त्यामुळे शेतात काहीच पीकलं नाही. कर्जाची परतफेड कशी करायची या चिंतेनं त्यांनी विष पिऊन आत्महत्या केली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 29, 2014 12:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close