S M L

वडाळा बलात्कार प्रकरणी संशयिताचं नवं रेखाचित्र जारी

Sachin Salve | Updated On: Nov 29, 2014 01:46 PM IST

वडाळा बलात्कार प्रकरणी संशयिताचं नवं रेखाचित्र जारी

wadala3454329 नोव्हेंबर : वडाळा बलात्कार प्रकरणी मुंबई पोलिसांनी शुक्रवारी एका संशयितांचं नवं रेखाचित्र प्रसिद्ध केलंय. तब्बल 175 संशयितांची तपासणी करुनही पोलिसांच्या हाती अद्यापपर्यंत कोणताही सुगावा लागलेला नाही. या बलात्कार प्रकरणाला महिनाभरापेक्षाही जास्त वेळ झालाय. पण, अजून आरोपीचा मागमूसही लागलेला नाही.

मुंबईतल्या वडाळा परिसरात 24 ऑक्टोबरला 9 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार झाला होता. सायन हॉस्पिटलमध्ये जनरल वॉर्डमध्ये तिच्यावर उपाचार सुरू होते. मृत्यूशी झुंज देत मुंग्यांनी वेढलेल्या बेडवर ती तळमळत होती. आयबीएन लोकमतनं हे प्रकरण जगासमोर आणलं. आयबीएन लोकमतच्या बातमीनंतर उपचाराचा संपूर्ण खर्च उचलण्याचं ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंनी आश्वासन दिलं. त्यानंतर आरोपीचं पहिलं रेखाचित्रही जारी झालं. तिच्या सुरक्षेसाठी महिला पोलीस मिळाले. आयबीएन लोकमतच्या पाठपुराव्यानंतर तिला मनोधैर्य योजनेतून मदतही मिळाली. आरोपींना शोधण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले. पण, 35 दिवसांनंतरही आरोपी मात्र मोकाटच आहे. आता नव्या रेखाचित्राचा काही उपयोग होतोय का ? हे पाहावं लागेल.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 29, 2014 01:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close