S M L

सेना-भाजपची 'मातोश्री'वर 'चाय पे चर्चा' सुरूच, तोडगा नाहीच !

Sachin Salve | Updated On: Dec 1, 2014 01:02 PM IST

सेना-भाजपची 'मातोश्री'वर 'चाय पे चर्चा' सुरूच, तोडगा नाहीच !

01 डिसेंबर : भाजप आणि शिवसेनेत सुरू झालेल्या चर्चा आध्यायाला आज चौथा दिवस उजाडला आहे. मात्र चर्चेच गुर्‍हाळ सुरूच असून निर्णय काहीही झालेला नाही. आमची चर्चा सकारात्मक झाली आहे. आतापर्यंत 80 टक्के चर्चा पूर्ण झाली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. लवकरच यावर तोडगा निघेल असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजपने अविश्वासाचा डाग पुसण्यासाठी शिवसेनेला सोबत घेण्याची हालचाल सुरू केली खरी पण अजूनही भाजपच्या हातात काहीही लागले नाही. शिवसेनेला सोबत घेण्यासाठी दिल्लीपासून गल्ली पर्यंत नेत्यांनी मातोश्रीवर धाव घेतलीये. पण सेनेला सोबत घेण्याचा अजूनही कोणताही तोडगा निघालेला नाही. भाजप आणि शिवसेनेची चर्चा सकारात्मक दिशेनं सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. आतापर्यंत 80 टक्के चर्चा पूर्ण झाल्याचंही फडणवीस यांनी म्हटलंय. शिवसेनेच्या सत्तासहभागाबद्दल लवकरच तोडगा निघेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजप दोनास एक मंत्रिपदं देण्यास तयार आहे. तसंच शिवसेना गृहखात्यासाठी आग्रही आहे, मात्र भाजप गृहखातं सोडण्यास तयार नाहीये. भाजप शिवसेनेला 4 कॅबिनेट आणि 8 राज्यमंत्रीपद देण्यास तयार आहे. शिवसेनेला 5 कॅबिनेट खाती हवीत. मात्र, शिवसेनेला गृह, अर्थ, ग्रामविकास, नगरविकास, शिक्षण, महसूल, अर्थ, ही खाती द्यायला भाजपचा नकार आहे. त्याऐवजी शिवसेनेला ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास, पर्यटन द्यायला भाजपची तयारी असल्याचं समजतं. त्यामुळे चर्चेचा आध्याय आजही सुरूच राहणार आहे असं दिसतंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 1, 2014 01:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close