S M L

ढकलपास आता बंद ?, आठवीपर्यंत पास होणे अनिवार्य

Sachin Salve | Updated On: Dec 1, 2014 01:56 PM IST

ढकलपास आता बंद ?, आठवीपर्यंत पास होणे अनिवार्य

8th class01 डिसेंबर : शालेय विद्यार्थ्यांची पहिले ते आठवी सुरू असलेली ढकलगाडी आता बंद होण्याची शक्यता आहे. नवव्या वर्गात विद्यार्थ्यांना ढकलण्याची पद्धत बंद होण्याची शक्यता आहे. परीक्षा नसल्याने अभ्यासाकडे विद्यार्थ्यांचं दुर्लक्ष होत होतं. त्यामुळे नववीत  आलेल्यानंतरही विद्यार्थी कच्चेच राहतात असा निष्कर्ष सीएसबीआईने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय शिक्षण अधिकारी मंडळाने काढला आहे.

शिक्षणाधिकार कायद्यानुसार पहिले ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पास करण्याची शिफारस आहे. त्यामुळे झालं असं की, पहिली ते आठवीपर्यंत परीक्षाच नसल्यामुळे विद्यार्थींना बिनदिक्कत नवव्या वर्गात प्रवेश मिळतो. पण नवव्या वर्गात दाखल झाल्यानंतरही काही विद्यार्थ्यांची अवस्था म्हणजे त्यांना पहिलेचे पुस्तकही वाचता येत नाही. शिक्षणाचा घसरत चाललेला दर्जा पाहता त्यामुळे वरच्या वर्गात ढकलण्याची पद्धत बंद करण्यात येणार आहे. हिवाळी अधिवेशनात यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 1, 2014 01:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close