S M L

नवी मुंबई बनतेय भाईंचा कारखाना

28 जून, नवी मुंबई स्वतःची गँग बनवण्याची फॅशन सध्या नवी मुंबईत तरुणांमध्ये पसरतेय. घरातून दुर्लक्ष, राजकारण्यांचा वरदहस्त,अणि पोलिसांची निष्क्रियता यामुळे नवी मुंबई बनते आहे भाईंचा कारखाना. मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबई वसवली गेली. या शहराने मुंबईपेक्षा आपलं वेगळंपण जपलं. पण मुंबईतील गुन्हेगारी नवी मुंबईने जशीच्यातशी उचलली. प्रत्यक्षात तर नवी मुंबई गुन्हेगारीच्या बाबतीत मुंबईच्या एक पाऊल पुढेच गेली. नवी मुंबईतील तरुणांमध्ये खंडणी, धमक्या आणि खून ही गुन्हेगारी आकर्षण ठरतेय. विशेषत: एरोलीतील 20 ते 25 वयोगटातील तरुण गुन्हेगारीकडे जास्त वळताहेत. शाळा-कॉलेजपासूनच ही मुलं गुंतू लागतात आणि हळुहळु गुन्हेगारीत अडकू लागतात. हे तरुण आधी समोरील व्यक्तींवर आपल्याजवळच्या पैशानं इंप्रेशन मारतात, घोळका जमवतात आणि हळूहळू आपली गँग तयार करतात. मग गँग पोसायला पैसे हवे म्हणून लहान मारामार्‍या, चोर्‍या करुन स्वत:चं प्रस्थ वाढवतात. स्थानिक राजकारणी अशांना हेरतच असतात. एकदा का राजकारण्यांचं कृपाछत्र मिळालं की झालेच हे तरुण भाई. एकदा जेलमधून जाऊन आले की त्या तरुणाभोवती इतर तरुणांचा गराडा तयार होतो. ऐरोलीतील सेक्टर एक ते चार, एरोली गाव, चिंचपाडा, दीघा हे अशा गँग्सचे प्रमुख अड्डे आहे. नवी मुंबई सुरवातीपासूनच दहशतीच्या छायेखाली राहिली. सुरवातीच्या काळात नगरसेवक देविदास चौगुले, सुजित सुतार, अन्नू अंाग्रे यांची दहशत ऐरोलीत होती. आजही आहे आणि आता त्यांची जागा घेतायत ही तरुण टोळकी.आता प्रश्न आहे तो या टोळक्यांचं प्रस्थ तयार होईपर्यंत पोलिस प्रशासक काय करत होते?

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 29, 2009 02:20 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 29, 2009 02:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close