S M L

आरिफचं नवी मुंबई कनेक्शन उघड, ब्रेनवॉश करणारा प्राध्यापक ताब्यात

Sachin Salve | Updated On: Dec 1, 2014 10:00 PM IST

arif01 डिसेंबर : कल्याणमधून जिहादसाठी गेलेल्या आरिफ माजिदचं नवी मुंबई कनेक्शन उघड झालंय. माजिदचं ब्रेनवॉश करणारा प्राध्यापक नवी मुंबईतला असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मुंबई एटीएसने त्या प्राध्यापकाला ताब्यात घेतल्याचं समजतंय.

कल्याणचा रहिवासी असलेला आरिफ माजिद आपल्या तीन मित्रांसह इराकमधील आयसीस दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी गेला होता. आपण जिहादसाठी इराकला गेलो होतो असा स्पष्ट कबुलीनामा आरिफने दिला होता. मागिल आठवड्यात त्याला भारतात आण्यात आलंय. सध्या एनआयएच्या कोठडीत आहे. त्याची चौकशी सुरू आहे. आयसीसच्या तावडीतून तो कसा सुटला आणि त्यानंतर तुर्कस्थानपर्यंत त्याचा परतीचा प्रवास कसा राहिला, हे त्यानं तपास अधिकार्‍यांना सांगितलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 1, 2014 09:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close