S M L

अंबरनाथमध्ये मतीमंद मुलीवर बलात्कार

Sachin Salve | Updated On: Dec 1, 2014 10:38 PM IST

 rape sds01 डिसेंबर : अंबरनाथ शहरात अल्पवयीन मतीमंद मुलीवर बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी पिंटू राठोड यांच्यावर अंबरनाथ पोलिसांत बलात्काराचा गुन्हा दाखल करून पोक्सा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्याला पोलिसांनी अटक केली असून 2 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बुवापाड परिसरात राहणार्‍या या असहाय्य मुलीवर शेजारीच राहणार्‍या पिंटू राठोड या नराधमाने बलात्कार केला आहे. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत या नराधमाने  मुलीचे तोंड दाबून तिच्यावर बळजबरी केली. आरोपीला कठोर शासन करीत आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी पिडित मुलीच्या आईने केली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 1, 2014 10:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close