S M L

माजी मुख्यमंत्री ए.आर.अंतुले यांचं निधन

Sachin Salve | Updated On: Dec 2, 2014 02:00 PM IST

antulay_pm_31302 डिसेंबर : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचं आज मुंबईतल्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजारानं निधन झालं. ते 85 वर्षांचे होते.. अंतुले गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. मागील आठवड्यात त्यांना उपचारासाठी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं मात्र आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अंतुले हे 1980 ते 82 या दोन वर्षांमध्ये मुख्यमंत्री होते. तसंच ते चार वेळा खासदारकी आणि दोन वेळा राज्यसभेचे सदस्यही होते. पण सिमेंट घोटाळ्यात आरोप झाल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं होतं. उद्या दुपारी बारा वाजता रायगडमधल्या आंबेत या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

ए.आर. अंतुले यांचा अल्पपरिचय

- 9 फेब्रुवारी 1929 ला रायगडमध्ये जन्म

- 1980 ते 1982 एवढाच काळ अंतुले मुख्यमंत्रीपदी होत

- अनेक खात्यांचे मंत्री, चार वेळा लोकसभेवर खासदार, दोन वेळा राज्यसभेचे सदस्य

- 2 वेळा राज्यसभेचं सदस्यत्व

- अंतुले आपल्या बेधडक स्वभावासाठी प्रसिद्ध

- सिमेंट घोटाळ्यात झालेल्या आरोपांमुळे गेलं मुख्यमंत्रीपद

- रायगडमध्ये शेकापच्या वर्चस्वाला पाडलं खिंडार

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 2, 2014 12:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close