S M L

पश्चिम महाराष्ट्रात पावसाची हजेरी : उत्तर महाराष्ट्र- मराठवाडा कोरडा

4 जुलैपश्चिम महाराष्ट्रातही पाऊस चांगला झाला. धरणाच्या क्षेत्रात आणि नद्यांच्या पातळीत चांगली वाढ झाली आहे. सांगलीत मात अजूनही पावसाची प्रतिक्षा आहे. राज्यात इतर ठिकाणी मात्र पावसाने दडी मारल्याचं चित्र आहे. उत्तर महाराष्ट्र अजूनही कोरडाच असून गंगापूर धरणात पाणीसाठा कमी आहे. नाशिक जिल्ह्याला पाणीटंचाईला सामोरं जावं लागतंय. पेरणी खोळंबल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये काही शेतकर्‍यांनी पाऊस येईल या आशेनं पेरणी केली होती. त्याठिकाणी आता दुबार पेरणी करावी लागणार आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, चार्‍यांचा गंभीर प्रश्न आता समोर येतोय. मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात 8.3 मिलीमीटर पाऊस, जालना- 3.4 मिलीमीटर, परभणी- 6.2 मिलीमीटर, बीड मध्ये- 9.0 मिलीमीटर, हिंगोली -3.0 मिलीमीटर, लातूर - 2.2 मिलीमीटर, नांंदेड - 2.2 मिलीमीटर, उस्मानाबाद - 5.3 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 4, 2009 02:40 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 4, 2009 02:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close