S M L

शेतक-यांना सावकारी पाशातून मुक्त करणारं टास्क फोर्स

7 जुलै शहरी आणि ग्रामीण भाग या दोघांचा समतोल साधणारं या वर्षीचं बजेट आहे. चालू आर्थिक वर्षात कृषी क्षेत्रात 4 टक्के विकासदराचं लक्ष ठेवण्यात आलंय. वेळेवर कर्जफेड करणा•या शेतक-यांना व्याजात एक टक्का सूटही देण्यात आली आहे. पण यापेक्षाही विशेष म्हणजे खास करून महाराष्ट्राचा विचार करून स्पेशल टास्क फोर्स नेमण्यात आलाय. खाजगी कर्ज घेतलेल्यांचा कर्जमाफीच्या योजनेत समावेश होऊ शकतो का, यावर विचार करण्यासाठी हे टास्क फोर्स काम करणार आहे. प्रणव मुखजीर्ंनी टास्क फोर्सची घोषणा म्हणजे शेतक-यांना दिलासाच. प्रणवदांनी बरोबर ओळखलं की शेतक•याला नुसतं कर्ज देऊन उपयोगाचं नाही, तर त्याला नाडणारे जे आहेत, त्यांचाही नायनाट केला पाहिजे. प्रणवदांच्या आधी महाराष्ट्राचे तत्कालिन गृहमंत्री आर आर पाटील यांनीही खाजगी सावकारांना कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढण्याची भाषा केली होती. पण प्रत्यक्षात ती वल्गनाच ठरली. राज्यभरातल्या सावकारी पाशावर एक नजर टाकुया.मराठवाड्यात गेल्या दीड वर्षात खाजगी सावकारांविरोधात साडेपाचशेहून अधिक तक्रारी आल्या. पण प्रत्यक्षात कारवाई झाली, फक्त 29 प्रकरणात. यापैकी सर्वाधिक म्हणजे 236 तक्रारी एकट्या जालनामधील आहेत. अमरावती विभागात गेल्या पाच वर्षात सावकारांविरोधातही मोठया प्रमाणात गुन्हे दाखल झाले. यवतमाळ, बुलडाणा, वाशिममध्येही हीच परिस्थिती आहे. बुलडाण्यात सर्वाधिक 152 गुन्ह्यांची नोंद झालीय. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात परवाना धारक सावकारांच्या सावकारीची उलाढाल 117 कोटी 40 लाखांच्या घरात आहे.कोल्हापूरमध्ये 2008 मध्ये सावकारीच्या 5 गुन्ह्यांची नोंद झालीय. तर 2009 मध्ये सावकारीचा एकही गुन्हा नोंदवला गेलेला नाही.सांगली जिल्ह्यात 2008 मध्ये सावकारीचे 9 गुन्हे दाखल झालेत. त्यामध्ये 11आरोपींना अटक करण्यात आलीय. तर 2009 मध्ये एप्रिलच्या अखेरीस 1 गुन्हा दाखल झाला असून दोन आरोपींना अटक करण्यात आलीय.आर. आर. पाटील सावकारी पाशाविरोधात स्वतःचा जिल्हा जरी कार्यक्षम बनवला असला, तरी इतर ठिकाणी मात्र या कार्यक्षमतेची टंचाई आहे, त्यामुळे प्रणवदांच्या टास्क फोर्सवरच आता पीडित शेतक-यांच्या आशा एकवटल्यायत. खाजगी सावकाराचा अर्थमंत्र्यांनी पहिल्यांदाच आपल्या अर्थसंकल्पात उल्लेख केला आणि टास्क फोर्स ची घोषणा केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 7, 2009 12:31 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 7, 2009 12:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close