S M L

युती सरकारच्या चहापानावर काँग्रेसचा बहिष्कार

Sachin Salve | Updated On: Dec 7, 2014 04:28 PM IST

manikrao_on_rane07 डिसेंबर : हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला युती सरकारने आयोजित केलेल्या सर्वपक्षीय आमदारांच्या चहापानावर काँग्रेसनं बहिष्कार टाकला आहे. मुख्यमंत्र्यांना गांभिर्य नाही, चहापानाला उपस्थित न राहणं हा संसदीय परंपरेचा अपमान असल्याची टीका काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरेंनी केली.

युती सरकारचं पहिल्या हिवाळी अधिवेशाला सामोरं जाणार आहे. मात्र अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणार्‍या चहापानावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केलीये. नियोजन आयोगाच्या पुनर्रचनेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले असल्यामुळे चहापानाला अनुपस्थित राहणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या अनुपस्थितवर राष्ट्रवादीचे नेते आणि काँग्रेसच्या नेत्यांनी सडकून टीका केली. हा विरोधकांचा अपमान असल्याची टीका अजित पवार यांनी केली होती. त्यांच्यापाठोपाठ काँग्रेसने चहापानावर बहिष्कार टाकत मुख्यमंत्र्यांना गांभिर्य नसल्याची टीका काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी केलीये.तसंच राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी कुठलंही पॅकेज जाहीर केलं नाही. सरकारनं 50 हजार कोटींचं पॅकेज जाहीर करावं, अशी मागणीही माणिकराव ठाकरेंनी केली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 7, 2014 04:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close