S M L

डाळीत पाणी आणि भाकरीच्या खापर्‍या !

Sachin Salve | Updated On: Dec 8, 2014 05:53 PM IST

डाळीत पाणी आणि भाकरीच्या खापर्‍या !

nadurbar_school08 डिसेंबर : जेवणात डाळीचं पाणी, सोबत भाकरीच्या खापर्‍या एवढंच की काय, 10 वी परीक्षा तोंडावर आली दोन महिन्यावर येऊन ठेपलीये. पण अजून पुस्तकांचा पत्ता नाही अशी अत्यंत वाईट अवस्था नंदुरबार जिल्ह्यातील खाजगी आश्रमशाळांमध्ये पाहण्यास मिळत आहे. नंदुरबारमधल्या तराडी गावच्या आश्रमशाळेतला हा सगळा प्रकार आता उजेडात आलाय.

नंदुरबार जिल्ह्यातील शहदा तालुक्यातल्या तराडी गावातील एम.डी सोनावणे आश्रमशाळेत पहिली ते दहावीचे 450 विद्यार्थी या ठिकाणी राहातात या आश्रमशाळेला आदिवासी विकास खात्यातून नियमीत निधी सुध्दा दिला जातो. त्यातून विद्यार्थ्यांचं शिक्षण व्हावं आणि पोषक आहार मिळावा ही अपेक्षा आहे. पण अंड,फळ,उसळ हा पोषक आहार तर दूरच, जे जेवण मिळते ते पण निकृष्ट दर्जाचं आहे. विद्यार्थ्यांच्या जेवणात डाळीत पाणी, भाकरीच्या खापर्‍या असतात. हद्द म्हणजे 10 वीची परीक्षा तोंडावर आली आहे तरी 10 विद्यार्थ्याना पुस्तक मिळालेली नाहीत. कारवाईच्या धाकामुळे विद्यार्थी तक्रारही करण्याचं धाडस करत नाहीये. 10 वीची परीक्षा दोन महिन्यांवर येऊनही विद्यार्थ्यांच्या पुस्तकांचा पत्ताच नाही, त्यामुळे 450 विद्यार्थ्यांचे पुस्तकं आणि जेवणाविना विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 8, 2014 05:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close