S M L

बीड डीडीसी बँक घोटाळ्या प्रकरणी धनंजय मुंडे अडचणीत

Sachin Salve | Updated On: Dec 8, 2014 08:13 PM IST

बीड डीडीसी बँक घोटाळ्या प्रकरणी धनंजय मुंडे अडचणीत

dhanjay_munde_dcc_bank08 डिसेंबर : बीड जिल्हा सहकारी बँक (डीडीसी) घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झालीये. या प्रकरणाची आज औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने या प्रकरणाची सर्व कागदपत्र 12 जानेवारीपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले आहे.

राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे धनंजय मुंडे यांनी या प्रकरणात दिलेला अडीच कोटीचा चेक वटला नाही. आजच्या सुनावणी दरम्यान चेक वटला नसल्याचा मुद्दा कोर्टासमोर ठेवण्यात आला. त्याुमळं न्यायालयाने या प्रकऱणात शासनाला कागदपत्र न्यायालयासमोर सादर करण्याचे आदेश दिले आहे. या साठी सरकारला 12 जानेवारीपर्यंतचा वेळ दिलेला आहे. या प्रकऱणाची सुनावणीही 12 जानेवारी रोजी होणार आहे. या प्रकऱणात धनंजय मुंडे आणि इतरांवर बोगस कागदपत्रांच्या आधारे जिल्हा मध्यवर्ती बँकेतून कर्ज घेतल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे आजच विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे यांचं नाव सुचवण्यात आलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 8, 2014 08:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close