S M L

'टाइम'च्या 'पर्सन ऑफ द ईयर' स्पर्धेतून नरेंद्र मोदी बाहेर

Sachin Salve | Updated On: Dec 9, 2014 01:21 PM IST

PM Narendra Modis Teachers Day Speech09 डिसेंबर : अमेरिकेची प्रतिष्ठीत टाइम मॅगझिन घेत असलेल्या 'पर्सन ऑफ द ईयर' च्या स्पर्धेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी बाहेर पडले आहेत. टाइम मॅगझिनच्या अंतिम आठजणांच्या यादीत मोदींना स्थान मिळालेलं नाही. हे आठजण 'टाईम मॅगझिन' ने अंतिम 50 जणांतून निवडले आहेत.या आठ जणांमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, गायिका टेलर स्विफ्ट अशांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना या स्पर्धेत 16 टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळाली. तर अमेरिकेत कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी निदर्शनं करणारे निदर्शक दुसर्‍या क्रमांकावर आहेत. हँागकाँगचा लोकशाहीवादी विद्यार्थी नेता जोशु वाँग, नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसफझाई आणि

ईबोलावर उपचार करणारे डॉक्टर्स हे पहिल्या 5 मध्ये आहेत. पण टाइमनं निवडलेल्या 8 जणांच्या अंतिम यादीमध्ये नरेंद्र मोदींचा समावेश करण्यात आलेला नाही. बुधवारी टाईमच्या संपादकीय मंडळाची बैठक होणार असून त्यात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 9, 2014 01:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close