S M L

दुष्काळी पॅकेज जाहीर करा, अधिवेशनात विरोधकांचा गदारोळ

Sachin Salve | Updated On: Dec 9, 2014 03:11 PM IST

दुष्काळी पॅकेज जाहीर करा, अधिवेशनात विरोधकांचा गदारोळ

09 डिसेंबर : हिवाळी अधिवेशनाला वादळी सुरुवात झाल्यानंतर आज विरोधकांनी दुष्काळप्रश्नी गदारोळ घातला. दुष्काळ प्रश्नावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन सरकारला चांगलंच धारेवर धरलंय. दुष्काळाग्रस्तांसाठी तातडीने पॅकेज जाहीर करण्यात यावं अशी मागणी विरोधकांनी केली. विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृहाचं आजचं कामकाज तहकूब करण्यात आलंय.

आज सकाळी पहिल्या सत्रात विधानसभेत दुष्काळावर चर्चा करावी अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केली. मात्र यावर चर्चा होत नसल्यामुळे विरोधक सभागृहाच्या हौदात उतरले. दुष्काळाचं आर्थिक पॅकेज जाहीर करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केली. तर दुसरीकडे आजच दुष्काळावर चर्चा करण्याचा प्रस्ताव सरकारनं देऊन त्यांना सडेतोड उत्तर दिलंय, असं सत्ताधार्‍यांचं म्हणणं आहे. विधानपरिषदेचं कामकाज गदारोळामुळे दोन वेळा तहकूब करावं लागलं. दुष्काळावर चर्चा करण्यापेक्षा आता तातडीने पॅकेज जाहीर करणं गरजेचं आहे पण सत्ताधारी निव्वळ चर्चा करण्याचा आग्रह करत आहे. मुळात आता चर्चेची वेळ नाही. सरकार विनाकारण चर्चेत वेळ वाया घालवत आहे अशी टीका काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. आज दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झाला दररोज आत्महत्या करण्याचा घटना घडत आहे. शेतकर्‍यांना यापासून रोखणं गरजेचं आहे. मात्र सरकार चर्चेत वेळ वाया घालवतं आहे. जनतेनं तुम्हाला निवडून दिलं आता निर्णय घेण्याची तुमची बारी आहे अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली. तर आघाडी सरकारने गेल्या 15 वर्षात काय केलं यावर चर्चा करत आहे. आमच्याकडून काही निर्णय चुकले असतील तर जरूर चर्चा करा पण आजही वेळ नाही तातडीने दुष्काळग्रस्तांच्या बाजूने उभं राहण्याची गरज आहे. त्यासाठी पॅकेज जाहीर केलं पाहिजे पण सत्ताधारी त्याला बगल देत आहे असा आरोप राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केली. तर दुष्काळप्रश्नी सरकारला धारेवर धरत राष्ट्रवादीनं विधानभवनाच्या आवारात निदर्शनं केली. अजित पवार, जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते या निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 9, 2014 02:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close