S M L

जायकवाडीचं पाणी अडवण्यासाठी नेतेही रस्त्यावर उतरले

Sachin Salve | Updated On: Dec 9, 2014 02:07 PM IST

जायकवाडीचं पाणी अडवण्यासाठी नेतेही रस्त्यावर उतरले

pichad_thorat09 डिसेंबर : जायकवाडी धरणात पाणी सोडण्यावरून अहमदनगर विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष पेटला. नगरच्या दोन्ही धरणातून पाणी सोडण्यात येऊ नये याविरोधात नगरमध्ये ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. नगरचे सर्वपक्षीय नेतेही या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे आंदोलनाला बळ मिळालंय.

मराठवाड्यातील जायकवाडी धरणामध्ये मुळा धरणातून पाणी सोडायला सुरूवात झालीय. मुळा धरणातून जायकवाडीसाठी 1100 क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात येतंय. तर भंडारदर्‍यातून 5000 क्युसेक वेगानं पाणी सोडलं जातंय. महामंडळाने दिलेल्या आदेशानुसार भंडारदरा पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याचं नियोजन सुरू केलंय. पण नगर जिल्ह्यातील शेतकरी याला विरोध करत आहेत. नदीवरचे बंधारे खुले करायला शेतकर्‍यांचा विरोध आहे. त्यासाठी आज दिवसभर नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं होत आहे. कोल्हापुरी पद्धतीचे 11 बंधारे नगर जिल्ह्यात आहेत. या बंधार्‍यांच्या खिडक्या उघडून पाणी सोडलं जाणार आहे. या सगळ्या 11 ठिकाणी शेतकरी सध्या आंदोलन करतायेत. राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासारखे नगर जिल्ह्यातले दिग्गज नेते ही आंदोलनात सहभागी झाले आहे. मधुकर पिचड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी अकोले पाटबंधारे कार्यालयाला घेराव घातला. तर1 बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी संगमनेर पाटबंधारे कार्यालयाला घेराव घातला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 9, 2014 02:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close