S M L

मुंबईतील सर्व टॅक्सी, रिक्षाचालकांची माहिती गोळा होणार !

Sachin Salve | Updated On: Dec 9, 2014 02:30 PM IST

मुंबईतील सर्व टॅक्सी, रिक्षाचालकांची माहिती गोळा होणार !

mumbai_taxi23452309 डिसेंबर : दिल्लीत उबर टॅक्सीत झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. 31 डिसेंबरपर्यंत सर्व टॅक्सी आणि रिक्षा चालकांची माहिती गोळा करण्याचे आदेश मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारियांनी दिले आहेत. पोलिसांकडे जी माहिती जमा करण्यात येईल, त्याची खातरजमा केली जाईल. हा आदेश स्वतंत्र रिक्षा, टॅक्सी आणि मेरू, टॅब कॅबसारख्या कंपन्यांना लागू आहे.

मागील आठवड्यात राजधानी दिल्ली पुन्हा एकदा बलात्काराच्या घटनेनं हादरली. एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करणारी तरुणी घरी जाण्यासाठी उबेर या कंपनीच्या टॅक्सीने निघाली होती. प्रवासादरम्यान तरुणीला डुलकी लागली. टॅक्सी ड्रायव्हरने याचा फायदा घेत टॅक्सी दुसरीकडे वळवली आणि तरुणीवर अत्याचार केला. या प्रकरणी आरोपी ड्रायव्हरला मथुरेतून अटक करण्यात आलीय. त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आलीये पण आरोपी ड्रायव्हर हा सराईत गुन्हेगार निघाला. 2011 मध्ये लैंगिक अत्याचार प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती आणि सात महिने तिहार जेलमध्ये त्याने शिक्षाही भोगली होती. हाच मुद्दा लक्ष्यात घेऊन मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारियांनी सर्व रिक्षा आणि टॅक्सी चालकांची माहिती गोळा करण्याचे आदेश दिले आहे. मुंबईत बहुतांश टॅक्सी आणि रिक्षा ड्रायव्हर हे इतर राज्यातून आलेले आहे. त्यामुळे याची अंमलबजावणी कशी होते हे पाहण्याचं ठरेल.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 9, 2014 02:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close