S M L

फिलच्या आठवणी आणि 63 रन्स !

Sachin Salve | Updated On: Dec 9, 2014 07:15 PM IST

फिलच्या आठवणी आणि 63 रन्स !

09 डिसेंबर : ऑस्ट्रेलियन क्रिकेटर फिलिप ह्युजेसच्या निधनातून सावरलेली ऑस्ट्रेलियन टीम त्यांच्या आठवणीसह आज मैदानात उतरली. भारताविरुद्ध पहिल्या दिवसाचा खेळ संपला खरा पण ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आपल्या या लाडक्या साथीदाराच्या आठवणींनी भावूक झाले होते. ओपनर डेव्हिड वॉर्नरने 63 रन्स केल्यानंतर आकाशाकडे पाहत बॅट उंचावून फिलला सलामी दिली तेव्हा अवघं स्टेडियअ स्तब्ध झालं होतं.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर फिलिप ह्युजेस एका सामन्यात 63 रन्सवर खेळत असताना एक उसळता बाऊंन्सर बॉल डोक्याला लागल्यामुळे तो मैदानावरच कोसळला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. फिलच्या अकाली निधनामुळे क्रिकेटजगतावर शोककळा पसरली होती. फिलच्या दुखातून सावरलेली टीम ऑस्ट्रेलिया भारताविरुद्ध आज मैदानात उतरली. मॅचच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन संघाने 13 जणांच्या संघात फिलिप ह्युजेसचा समावेश करून त्याला आदरांजली वाहिलीय. ह्युजेसच्या स्मृती कायम राहाव्यात यासाठी त्याची कसोटीतील 428 नंबरची कॅप सर्व खेळाडूंनी घातली आहे. आजच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या इनिंगमध्ये 6 विकेट्स गमावत 354 रन्स झाले आहेत. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन मायकेल क्लार्कने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. ओपनर डेव्हिड वॉर्नरने 19 चौकार ठोकत आक्रमक सेंच्युरी ठोकली. अखेर 145 रन्सवर त्याची इनिंग संपली. कॅप्टन मायकल क्लार्क आणि स्टीवन स्मिथ यांनी हाफसेंच्युरी ठोकली. भारतातर्फे वरूण ऍरॉन आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स काढल्या. तर टेस्ट पदार्पण करणार्‍या लेगस्पिनर कर्म शर्मा आणि इशांत शर्मा यांना एक विकेट मिळाली. पहिल्या दोन सत्रात ऑस्ट्रेलियन बॅटसमननी भारतीय बॉलर्सवर वर्चस्व गाजवलं पण शेवटच्या सत्रात भारतीय बॉलर्सनी झटपट विकेट काढत ऑस्ट्रेलियाची फलंदाजी रोखली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 9, 2014 07:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close